

rat३०p१.jpg-
P२४N०८०४५
रत्नागिरी ः छिद्र पडल्याने पूर्णगड किनाऱ्यावर बुडणारी बोट.
rat३०p२.jpg-
२४N०८०४६
बोटीतील खलाशांना तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचा जीव वाचवला.
---------------
छिद्र पडल्याने नौकेला समुद्रात जलसमाधी
तटरक्षकच्या हेलिकॉप्टरमुळे खलाशांना जीवदान ; समुद्रात १२.७ नॉटिकल मैलावर रेस्क्यू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : तालुक्यातील पूर्णगड येथील समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर एक मच्छीमारी नौका बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि नौकेवरील दोन खलाशांना जीवदान दिले. नौकेला छिद्र पडल्यामुळे त्या बोटीला जलसमाधी मिळाल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाला गुरूवारी (ता. २९) सायंकाळी केरळकडे जात असलेली माऊली मासेमारी नौका पूर्णगडाजवळ बुडत असल्याचा संदेश सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मिळाला. रत्नागिरीपासून सुमारे १२.७ नॉटिकल मैल (अंदाजे २३ किमी) अतंरावर ती नौका होती. तटरक्षक दलाने शोध आणि बचाव (SAR) यंत्रणा सक्रिय करत कमी कालावधीत ऑपरेशन सुरू केले. मेरीटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन केंद्राने (MRCC) पूर्णगड भागातील नाविकांना घटनास्थळावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत देण्यासाठी सूचना दिली.
रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या एअरस्टेशनच्या समन्वयाने खलाशांचा जीव वाचवण्यासाठी हवाई मोहीम आखली. एका तासाच्या आत स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर हे मच्छीमारांची सुटका करण्यासाठी पूर्णगडला पाठवण्यात आले. जोरदार पाण्याच्या प्रवाहाशी झुंजत असलेल्या दोन मच्छीमारांना बुडणाऱ्या बोटीतून मदतीसाठी ओरडताना मदतपथकाने पाहिले. अत्यंत आणि आव्हानात्मक हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत अचूकपणे दोन मच्छीमारांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांना एअरस्टेशनवर आणण्यात आले. तिथे त्यांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळाली. त्या नौकेवर कर्नाटकातील २ मच्छीमार होते आणि ते कर्नाटकातील मालपे येथे नौका घेऊन जात होते. दुपारच्या सुमारास बोटीला एक छिद्र पडले. ज्यामुळे समुद्राचे पाणी वेगाने नौकेत शिरले. मदत पथकाने मासेमारी नौका नांगर टाकून तिथेच उभी करून ठेवली होती.
नौका बुडाल्याचा अंदाज
समुद्र खवळलेला असल्यामुळे तटरक्षक दलाच्या नौका किनाऱ्यावर आणणे शक्य झाले नाही. खलाशांना बाहेर काढल्यानंतर ती नौका बुडाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.