सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी

सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी
Published on

08140

सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी
विशाल परबः सांगेलीत व्यावसायिकांना किटल्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. आगामी काळात दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पाठीशी राहणार असल्याची ग्वाही युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
सांगेली येथील गिरीजानाथ दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला श्री. परब यांनी भेट दिली व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून सभासदांना दुधाच्या किटल्या भेट दिल्या. श्री. परब म्हणाले, ‘‘भविष्यात दुग्ध व्यवसाय हा शेती व्यवसायावर अवलंबून असणारा जोडधंदा म्हणून न राहता सहकाराच्या माध्यमातून तो उद्योग म्हणून कोकणात प्रभावी ठरावा. त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना माझे सर्वतोपरी सहकार्य राहील.’’
यावेळी शेतकऱ्यांनी परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, सांगेली सरपंच लवू भिंगारे, पुरुषोत्तम राऊळ, चेअरमन सोसायटी सांगेली, पंढरीनाथ पुनाजी राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, पुंडलिक कदम, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सांगेली गावाचे माजी उपसरपंच वामन नार्वेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम सावंत, चंद्रकांत सनाम, बाळा देवकर, आनंद राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रोहीत राणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com