प्रांताधिकारी कातकर यांचा चर्मकार समाजातर्फे सत्कार

प्रांताधिकारी कातकर यांचा 
चर्मकार समाजातर्फे सत्कार
Published on

08154

प्रांताधिकारी कातकर यांचा
चर्मकार समाजातर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता.३० : येथील प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते प्रांताधिकारी श्री. कातकर यांना मानाचा फेटा बांधून आणि शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त एलआयसी अधिकारी हरी चव्हाण, इलेक्ट्रिक अभियंता सुभाष भंडारे, मंगेश साळसकर आदी उपस्थित होते. जगदीश कातकर यांच्या लोकाभिमुख सेवेची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते त्यांना स्वातंत्र्यदिनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. श्री.कातकर यांनी नेहमीच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना कणकवली-देवगड-वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील जनतेच्या कामांना नेहमीच न्याय दिला. महसूल विभागाकडील आवश्यक दाखले अथवा अन्य महसुली कामे करताना कधीच अडवणूक केली नाही. उलट वेळेचे बंधन न पाळता आपण लोकसेवक आहोत ही भावना जपून त्यांनी महसूल विभागाचा कारभार अधिक गतिमान केला. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या याच कार्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. कातकर यांनी अधिकारी पदावरून समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com