डॉ. आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन

डॉ. आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन
Published on

डॉ. आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन
मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक विजय खाडे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी व पर्यवेक्षक शांताराम बैकर यांनी दीपप्रज्वलन केले. क्रीडाशिक्षक संजय अवेरे यांनी मेजर ध्यानचंद यांचे जीवन व हॉकीतील योगदान या विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्‍व सांगितले. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शैलेश खताते यांनी केले.

फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे रक्तदान
सावर्डे ः सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने आयोजित रक्तदान शिबिरात ४५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. बत्तासे यांनी केले. या वेळी प्राथमिक आरोग्यकेंद्र येथील प्रफुल्ल केळसकर आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. मच्छिंद्र गोवळकर उपस्थित होते.


08074
डॉ. भीमराव पाटील यांना जीवनगौरव
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. भीमराव पाटील यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी डेक्कन शूगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ( इंडिया) या पुणे येथे १९३६ ला स्थापन झालेल्या ख्यातनाम संस्थेतर्फे डॉ. पाटील यांनी ४० वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कृषी सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्याच्या जे. डब्लू. मारियट हॉटेलमध्ये संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात हा सोहळा झाला.

नातू महाविद्यालयात शिक्षक पालक बैठक
चिपळूण ः तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची बैठक झाली. बैठकीत हिंदी विभागप्रमुख प्रा. रामचंद्र माने यांनी प्रवेश फी व शासनाच्या विविध शिष्यवृत्तीबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी पालकांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. प्रा. प्रियंका गोयथळे यांनी महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्रात होणार्‍या परीक्षांबद्दल माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षेमध्ये झालेले बदल सांगितले. राजेंद्र महाडिक, हरिश्चंद्र पवार, दर्शना पालशेतकर, समिधा चव्हाण आदींची पालक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता काटकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com