

08159
ओणीत आंतरमहाविद्यालयीन
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन
राजापूर, ता. ३० : प्रबोधनकार ठाकरेंच्या परखड विचारांचे वारस या भूमीत तयार व्हावेत, या उद्देशाने आयोजित केलेल्या या संधीचा उपयोग करत सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी वक्त्यांनी तयार व्हावे, असे आवाहन अॅड. वासुदेव तुळसणकर यांनी केले.
तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. संस्थाध्यक्ष अॅड. तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रदीप संसारे, अरविंद गोसावी, शहाजीराव खानविलकर, अॅड. गुरुदत्त खानविलकर, संजय सावंत, महादेव धुरे, प्रमोद लिमये, विवेक सावंत, नामदेव तुळसणकर, रामचंद्र वडवलकर, गणपत जानस्कर, आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४१ विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेमध्ये ‘प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय युवा वक्ता पुरस्कार’ हा प्रथम तीन विजेत्यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.