

-rat३०p२८.jpg-
२४N०८१५८
पावस : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार स्वामींची प्रतिमा देऊन करताना शिल्पा पटवर्धन. सोबत गोविंददेव गिरी महाराज, पालकमंत्री उदय सामंत, जयंत देसाई, ऋषिकेश पटवर्धन आदी.
स्वामी स्वरूपानंदांच्या महाकाव्याचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० : परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या ‘मृत्युपत्र’ या महाकाव्याचे प्रकाशन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष प. पू. श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. समाधी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वामी स्वरूपानंद लिखित अमृतानुभव या पुस्तकाचे वासुदेव जोशी यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन स्वामीजींच्या हस्ते झाले. आपल्या ओघवत्या प्रवचनात परमपूज्य स्वरूपानंदांच्या अमृतानुभव आणि मृत्युपत्र या महाकाव्याचे अनेक संदर्भ त्यांनी विशद केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्याचा आध्यात्मिक प्रवास उलगडून सर्व स्वामीभक्तांसमोर मांडला. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळी देवस्थाने, रत्नागिरीतील सुपुत्रांच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांचे स्मरण केले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी ५०व्या पुण्यतिथीच्या वर्षातील सेवा मंडळाने केलेल्या विविध कामांचा आलेख मांडला आणि सेवा मंडळाची भूमिका सर्व स्वामीभक्तांसमोर मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.