

08179
आत्मविश्वास असल्यास यशस्वी झेप
गावडेकाका महाराज ः माड्याचीवाडी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः आत्मिक शक्ती व आत्मविश्वास प्रामाणिक असेल तर शैक्षणिक जीवनात यशस्वी झेप घेता येऊ शकते. मन ही एक अद्भुत शक्ती आहे, मन केंद्रित करून अभ्यास केल्यास स्मरणशक्ती वाढते. विद्यार्थ्यांनी याचा अवलंब करत ध्येय साध्य करावे, असे आवाहन निसर्ग उपचारतज्ज्ञ तथा आध्यात्मिक गुरू प. पू. सद्गुरू गावडेकाका महाराज यांनी माड्याचीवाडी येथे केले.
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमात गावडेकाका महाराज बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजिनदार गौरव मुंज, विश्वस्थ देवीदास रेडकर, मनीष नाईक, श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा गोवाचे अध्यक्ष अमित कोरगावकर, प्रा. आनंद सावंत, दिलीप सुतार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यार्थी व पालकांच्या हस्ते झाले. श्री. गावडेकाका म्हणाले, ‘‘आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आई-वडील आपल्यासाठी कष्ट करीत असतात. ही जाणीव ठेवून अभ्यास करा. विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जोपासली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना योग निद्रा हे वरदान ठरणार आहे.’’ प्रा. आनंद सावंत यांनी ‘‘विद्यार्थ्यांचा यश प्राप्त करण्यासाठी दृष्टिकोन प्रबळ, इच्छाशक्ती सकारात्मक ठेवून स्मरणशक्ती वाढवत अभ्यास केला पाहिजे,’’ असे सांगितले. आनंद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. राकेश केसरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.