

पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घालण्यास नकार
उच्च न्यायालय ; पुढच्या वर्षीपासून काटेकोर अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पीओपी गणेशमूर्तींवर घालण्यात येणारी बंदी हा विषय समोर आल्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेला त्याची नोटीस बजावण्यात आली होती. पालिकेच्यावतीने ॲड. राकेश भाटकर यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने आता तात्पुरत्या स्वरूपात दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पीओपी गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांवर प्रदूषण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिले आहेत; मात्र यावर्षी पीओपी गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० ला पीओपी गणेशमूर्ती बनवण्यास तसेच वापरण्याससुद्धा बंदी घातली होती. मातीचे गणपती वापरण्यासाठी आणि बनवण्यासाठी सक्तीचे करावे, अशा प्रकारची नियमावली बनवण्यात आली होती. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अनेकवेळा महानगरपालिका तसेच पालिका यांना आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन होत नव्हते यामुळे ठाणे येथील रहिवासी रोहित जोशी यांनी संगमेश्वर, रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र जाधव यांच्या सोबत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेमध्ये पीओपी मूर्तींवरती बंदी आणावी आणि तशा प्रकारच्या सूचना नगरपालिका तसेच महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांना देण्यात यावी, अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणाची नोटीस रत्नागिरी पालिकेलासुद्धा बजावण्यात आली होती. आज ३० ऑगस्ट २०२४ ला या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय तसेच बोरकर यांच्या खंडपिठासमोर झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.