स्थानिकांशी रिफायनरीबाबत चर्चा करणार

स्थानिकांशी रिफायनरीबाबत चर्चा करणार
Published on

स्थानिकांशी रिफायनरीबाबत चर्चा करणार
उदय सामंत ; आता सरसरट विरोध दिसत नाही
रत्नागिरी, ता. ३०ः ग्रीन रिफायनरीबाबत आतापर्यंत आंदोलकांशी चर्चाच होत नव्हती. परंतु आता चर्चेची दारे खुली झाली आहेत. पुढच्या आठवड्यात मी स्थानिकांशी रिफायनरीबाबत चर्चा करणार आहे. लोकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
एमआयडीसी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, रिफायनरी आंदोलकांशी यापूर्वी कधीच चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर होत नव्हता. परंतु आता लोक चर्चा करण्यास तयार आहेत. जो तीव्र विरोध होता, तो काही प्रमाणत मावळला आहे. आता सरसरट विरोध दिसत नाही. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेऊ तो स्थानिकांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल. उद्योग मंत्री म्हणून मी पुढाकार घेऊन पुढच्या आठवड्यात याबाबत चर्चा करणार आहे. आंदोलन होऊ नये, यासाठीच माझा प्रयत्न असणार आहे.

चौकट
मानसिकता बदलण्याची गरज
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला विरोध होत आहे. यामुळे उद्योजकांची जिल्ह्यात येण्याची मानसिकता आहे का, या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, हे खरं आहे, आजपर्यंत आपल्याकडे येणाऱ्या प्रकल्पाला विरोधच झाला आहे. परंतु आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. रोजगार निर्मितीसाठी उद्योग हवे आहेत. प्रदूषण विरहित प्रकल्प आणण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकल्पांचे स्वागत करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com