रत्नागिरी- मूकबधिरच्या माजी विद्यार्थ्यांकडून

रत्नागिरी- मूकबधिरच्या माजी विद्यार्थ्यांकडून
Published on

11836

मूकबधिरच्या माजी विद्यार्थ्यांकडून
रमेश घवाळी यांना प्रेरणा पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील कलाशिक्षक रमेश पांडुरंग घवाळी यांना माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केले. श्री. घवाळी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार केला. यापूर्वी पहिला प्रेरणा पुरस्कार शाळेच्या माजी शिक्षिका सुधा भावे यांना प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कलाशिक्षक घवाळी यांनी आपल्याला सगळे शिकवून स्वयंपूर्ण केले, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे. ते शाळेमध्ये आल्यामुळे शब्दांत भावना व्यक्त करायला शिकतात. पण शाळा अभ्यासाबरोबरच कलेच्या माध्यमातून हे सगळे शिकविल्यामुळे मुले स्वयंपूर्ण जीवन जगू शकतात. आज ही कल्पना तसेच सर्व तयार करणे, वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये मुले व्यस्त असतात. सगळे मिळून एखाद्या इव्हेंटमधील वेगवेगळे कलेचे आविष्कारही मुले साकारत आहेत.
कलाशिक्षक श्री. घवाळी यांना प्रेरणा पुरस्काराची स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि फोटोच्या कोलाजची फ्रेम हे साहित्य ऋणाली बडद हिने स्वतः हस्तकौशल्यातून साकारली होती. श्री. घवाळी यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुतारकाम, मातीकाम, अक्षरलेखन, संगीतशिक्षण, नाटकाचे नेपथ्य, घरातील छोट्या छोट्या गोष्टी दुरुस्त करायला शिकवले. संगणक शिक्षणही दिले, असे पुरस्काराच्या सन्मानपत्रात म्हटले आहे. यासंबंधी माजी विद्यार्थ्यांना निवृत्त मुख्याध्यापिका सौ. ताटके व निवृत्त शिक्षिका श्रीमती कोळंबेकर यांनी मार्गदर्शन केले. संस्था शाळा व पालक यांच्या सहकार्यामुळे श्री. घवाळी यांना प्रदान केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक गजानन रजपूत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट १
माजी विद्यार्थी कलाकार
शाळेचे माजी विद्यार्थी आता कलाकार बनले आहेत. कला आत्मसात करुन त्यात नैपुण्य मिळवत आहेत, हे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य आहे. याच माजी विद्यार्थ्यातील ऋणाली बडद व मासूमा गोलंदाज यांच्या नेतृत्वाखील ७/८ जणांच्या टीमने अलीकडेच त्यांच्या ओळखीत लग्नाच्या इव्हेंटमध्ये घरात इंटिरिअर डेकोरेशन, मेहंदी, पुष्परांगोळ्या, रांगोळी डिझाईन व वारली पेंटिंगसह पायघड्यांचे डेकोरेशन करून इव्हेंट साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com