मालवण ‘आयटीआय’मध्ये संविधान मंदिर

मालवण ‘आयटीआय’मध्ये संविधान मंदिर
Published on

11913

मालवण ‘आयटीआय’मध्ये संविधान मंदिर

प्रशिक्षणार्थींसाठी सुविधा; मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान मंदिराचे उद्‍घाटन आयटीआयचे प्राचार्य सचिन संखे व तंत्रनिकेतन प्राचार्य पी. एस. शिरहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्याने कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना खरी सामाजिक न्यायाची शिकवण मिळावी, यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराची स्थापना केली आहे. संविधान मंदिराचे उद्‍घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज एलफिन्स्टन विद्यालय मुंबई येथून आभासी पद्धतीने झाले.
संविधान मंदिराबाबत जागरूकता आणण्यासाठी १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान प्रा. संखे यांच्या निरीक्षणाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जेणेकरून घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल जागरूकता, संविधानाच्या दुरुस्त्या, कायदेशीर कलम, राज्यघटनेचे आकलन याद्वारे प्रशिक्षणार्थींच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने केला गेला. येथील उद्‍घाटन कार्यक्रमास प्राचार्य पी. एस. शिरहट्टी, संस्थेतील कर्मचारी, आजी माजी प्रशिक्षणार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com