

शंभरहून अधिक शाळात येणार कंत्राटी शिक्षक
चिपळूण तालुक्याची स्थिती; २० आणि १० पेक्षा कमी पटसंख्येसाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : जिल्हा परिषदेच्या २० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील शंभरहून जास्त शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक (७० वर्षाची वयोमर्यादा) किंवा डीएड बीएड धारकांची नेमणूक करण्यात येणार आहे. चिपळुणातील शंभरहून अधिक शाळामध्ये कंत्राटी शिक्षण नेमले जाण्याची शक्यता आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची चर्चा करण्यात येत असताना आता कमी पटसंखेच्या शाळांमध्ये कंत्राटी गुरुजींची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संस्थांच्या शाळांमधील पदे कायमची संपुष्टात येणार आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते.
फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षण नेमण्याचा निर्णय घेतला. आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबर डीएड, बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही यात कंत्राटी शिक्षक म्हणून संधी देण्यात येणार आहे. या नेमणूक देण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शासन निर्णय निर्गमित केला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३१६ शाळा आहेत त्यामध्ये ९००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २० पटसंख्या असलेल्या शाळांची १०० पेक्षा जास्त आहे.
कोट
आता मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्याच्या शाळावर प्रत्येकी एक डीएड धारकांचा शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक देण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे. परंतु अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या कार्यरत शिक्षकापैकी त्या शिक्षकांना तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यावर निवड कोणी कशा पद्धतीने करायची या संदर्भात शिक्षण संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील. त्यानुसार काही दिवसात कारवाई केली जाईल.
- दादासाहेब ईरणक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.