

‘विघ्नहर्ता तू मोरया’ गाणे प्रदर्शित
मंडणगडचे संकेत शिर्के यांचे संगीत
मंडणगड, ता. १५ ः मंडणगड तालुक्यातील युवा संगीतकार संकेत शिर्के यांनी संगीतबद्ध केलेले देशातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भाष्य करणारे आणि महिलांनी वेळ वाया न घालविता स्व संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असल्याचा संदेश देणारे गाणं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर इनो म्युझीक युट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाले आहे. समाज माध्यमात ते चांगलेच व्हायरल होवून रसिक प्रेक्षकांचे पसंतीस उतरले आहे.
गाणे मयूर सुकाळे ( गाऊ नको किसना आणि जीव झाला बाजींद फेम ) व गौरव चाटी (हिरकणी, गदर २, दगडी चाल २ फेम ) यांनी गायले असून सुप्रसिद्ध गीतकार तसेच गझलकार आनंद पेंढारकर यांनी गीत लिहीले आहे. या गाण्याचे संगीतकार मंडणगड येथील संकेत शिर्के हे आहेत. संकेत शिर्के यांनी यापूर्वी माझ्या विठ्ठल-आदर्श शिंदे, जीव झाला बाजींद- मयूर सुकाळे तसेच मन नाचरे अशा अनेक गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.