चिपळूण-नाईक कंपनी पुलावर वाहतूक कोंडी नित्याची

चिपळूण-नाईक कंपनी पुलावर वाहतूक कोंडी नित्याची
Published on

11949

नाईक कंपनी पुलावर वाहतूक कोंडी नित्याची
नागरिक, वाहनचालक हैराण ; वाहतूक पोलिसांची गरज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : गोवळकोट, पेठमापचा भाग चिपळूण शहराला जोडणाऱ्या नाईक कंपनी पुलावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. नव्याने बांधलेल्या पुलाचे रुंदीकरण झाले तरी वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज आहे.
गोवळकोट मोहल्ला, गोवळकोट रोड, पेठमाप हे शहराचे उपनगर नाईक कंपनी येथील पुलामुळे चिपळूण शहराला जोडले जातात. तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान निधीतून या पुलाचे बांधकाम करण्यात आले. जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक आणि अरुंद असल्यामुळे नव्या पुलाची बांधणी करण्यात आली. मात्र या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे आता या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. वालोपे, पेढे, परशुराम भागातून चिपळूण शहरात येणारी वाहने या पुलावरून येतात. कालुस्ते, भिले आदी भागातील नागरिक शहरात येताना याच पुलाचा वापर करतात. शहरातील जुन्या कोकण मर्कंटाइल बँकेच्या परिसरात रस्त्यावरच अनधिकृत मासे विक्रीचा व्यवसाय चालतो. त्या परिसरात रिक्षा आणि इतर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे फुलावरून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मिळत नाही. येथे एखादे मोठे वाहन आले तर छोटी वाहने अडकून पडतात. मालवाहतुकीची वाहने दिवसा बाजारपेठेत आल्यानंतर त्या परिसरातील वाहतूक कोंडी ही नेत्याची ठरलेली असते. तोच प्रश्न आता नाईक कंपनी पुलावर ही निर्माण झाला आहे.
------------
कोट
मुळात डावीकडून पेठमापातून येताना पुलावरून उजवीकडे वळावे लागते व बाजारातून पुलावर येताना उजवीकडून डावीकडे यावे लागते. इथेच चूक आहे. त्यात काही बदल घडवावा लागेल. जाताना व येताना दोन्ही बाजू वाहने क्रॉस कराव्या लागतात त्यामुळे गर्दी तुंबते आहे.
--प्रकाश उर्फ बापू काणे
----------
कोट
नाईक कंपनीच्या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. ती सोडवण्यासाठी येथे वाहतूक पोलिस नेमणे आवश्यक आहे.
--मंदार चिपळूणकर, नागरिक

..........मुझफ्फर खान............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com