नीलेश राणे यांनी घेतले ''बांद्याच्या बाप्पा''चे दर्शन

नीलेश राणे यांनी घेतले
''बांद्याच्या बाप्पा''चे दर्शन
Published on

11958

नीलेश राणे यांनी घेतले
‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते नीलेश राणे यांनी रविवारी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, भाजप सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष श्‍वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, युवा मोर्चा सावंतवाडी तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, प्रसाद वाळके, ऋषी हरमलकर, साईनाथ धारगळकर, नीलेश ऊर्फ पापू कदम यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाने केलेल्या सजावटीचे राणे यांनी कौतुक केले. राणे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर राणे यांनी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गणरायांचे दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com