संचित रजेवर गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

संचित रजेवर गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा
Published on

संचित रजेवर गेलेल्या
आरोपीविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर गेलल्या आरोपी परत कारागृहात दाखल झाला नाही. या प्रकरणी शहर पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फाईक मुस्ताक करंबळेकर (रा. ए-विंग, प्राईड प्लाझा, शिवाजीनगर, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ सप्टेंबरला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, जि. कोल्हापूर) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फाईक यास १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याला २८ दिवसांच्या संचित रजेवर मुक्त केले होते. रजा उपभोगून त्याने स्वतः कारागृहात दाखल होणे अपेक्षीत होते. पण आरोपी अद्यापही कारागृहात दाखल झाला नाही. तो १२ सप्टेंबरपासून अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत आहे.
-----
महिलेची फसवणूक
प्रकरणी दोघावर गुन्हा
रत्नागिरी ः इंन्स्टाग्राम अॅपवर वेगवेगळे टाक्स पूर्ण केल्यावर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची १ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पियुष यादव, मिनाक्षी गानोरकर (पूर्ण नाव, गाव, पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १८ ते १९ जुलै सायंकाळी पावणेसातच्या सुमारास फणसोप सडा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी फिर्यादी महिलेच्या इन्स्टाग्राम अॅपवर एक लिंक पाठवली व टेलीग्राम अॅपवर बोलणे करुन वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीत जास्त परतावा देण्यात येईल असे आमिष दाखविले. फिर्यादी यांनी त्यांच्या बहिणीच्या बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावरुन वेगवेगळ्या बॅंक खात्यावर गुंतवणुकीसाठी रक्कम संशयितांनी स्वीकारली. त्यांनतर फिर्यादी महिलेने भरलेल्या १ लाख तीन हजारापैकी ३ हजार रक्कम संशयितांनी परत केली. मात्र एक लाख रुपये परत न करता फसवणूक केली.
--------
दोन दुचाकींच्या
अपघातात एक जखमी
रत्नागिरीः दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन अपघात करण्याऱ्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हणमंत साबान्ना चित्तप्पगोल (वय ३२, रा. रवींद्र नगर, कुवारबाव)असे संशयित दुचाकी स्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास खेडशी-गयाळवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हणमंत यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इन्शुरन्स, पियुसी नसताना दुचाकी (एमएच-०३-बीई-१६०१) घेऊन खेडशी गयाळवाडी येथे जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुचाकी (एमएच-०८-बीए-८१६४) हिला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणीत रमेश खापरे (रा. खेडशी, डफळचोळवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
-----
रुग्णालयात आरडाओरडा
प्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करुन शांततेचा भंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सचिन लहू खाके (वय ३१, रा. चिंचवाडी, हरचेरी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन याने मद्य प्राशन जिल्हा रुग्णालयात शिवीगाळ व आरडा ओरडा करुन शांततेचा भंग केला.
-
घसरुन पडलेल्या
प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरीः पाय घसरुन गव्हाच्या पोत्यासह पडल्याने जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष सीताराम पवार (४८, रा. मेमन हॉल, अल्फला कॉलनी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना २ सप्टेंबरला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष पवार हे त्यांचा मित्र महादेव केसरकर यांच्या हॉटेलजवळ गव्हाचे पोते उचलून त्यांना मदत करण्यासाठी गेले होते. गव्हाचे पोते उचलून ते हॉटेलमध्ये ठेवत असताना ते पाय घसरुन पडले. त्यामध्ये त्यांच्या मणक्याला मार लागून दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथे उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. १३) सप्टेंबरला दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com