पाईपलाईनच्या चरात एसटी फसली

पाईपलाईनच्या चरात एसटी फसली
Published on

11976

जांभळीतिठ्याजवळ
चरात एसटी फसली
चालकाचे प्रसंगावधान ; एसटी न उलटल्याने प्रवासी सुखरूप
राजापूर, ता. १५ ः तालुक्यातील पांगरे धरणावरून राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक नळपाणी योजनेची पाईपलाईनसाठी रस्त्या शेजारी खोदलेल्या चरात पाचल-राजापूर एसटी मातीत फसली. चालकांच्या प्रसंगावधनामुळे बस उलटली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हा प्रकार जांभळीतिठ्याजवळ घडला.
पांगरे-चिंचवाडी धरणावरून जलजीवन मिशन अंतर्गत तेरा गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेचे पाईपलाईन टाकली जात आहे. हे काम करताना राजापूर रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्यासहीत गावांमधील वाडीवस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली. रस्त्याच्या शेजारीच खोदकाम करण्यात आले असल्याने ती जागा माती सैल होऊन पावसामुळे खड्डेमय झाली आहे. त्यामुळे साईडपट्टीवरून वाहन घेऊन जाणे जिकरीचे झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही संबधितांनी त्यांची दखल घेतलेली नाही. आज दुपारी पाचल-राजापूर ही फेरी राजापूरकडे येत असताना जांभळी तिठ्यानजीक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना साईडपट्टीवर फसली. अरुंद रस्ता असल्याने पाईपलाईनच्या खोदाईमुळे रविवारी एसटी साईडपट्टीवर फसली. काही दिवसांपूर्वी राजापूर-फुपेरे ही बसही मातीत फसली होती. रविवारी चौथ्यांदा हा प्रसंग घडला आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बस उलटली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com