कसालजवळ एसटीची कंटेनरला धडक

कसालजवळ एसटीची कंटेनरला धडक
Published on

कसालजवळ एसटीची कंटेनरला धडक

१५ प्रवासी जखमीच; स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला एसटीने जोरदार धडक दिली. या धडकेत एसटीतील सुमारे १५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेसातच्या दरम्यान घडला. जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की ः मालवण आगाराची कोल्हापूरकडे जाणारी मालवण-कोल्हापूर एसटी बस (एमएच ०७ बीएल २७१८) आज सकाळी सात वाजता कसाल बसस्थानकातून सुटली. या बसमध्ये सुमारे १५ ते २० प्रवाशी होते. ही कणकवलीच्या दिशेने कसाल सेवा रस्त्यावरून जात होती. मुंबई-गोवा महामार्गावर येत असताना त्याच रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत एसटीतील सुमारे १५ प्रवाशी जखमी झाले. त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली. तसेच एसटीचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या बाजूच्या भागातील पत्रा तुटला. गाडीच्या काचाही फुटल्या. स्थानिकांनी व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. जखमी प्रवाशांना तत्काळ तेथीलच डॉ. पवार यांच्या खासगी रुग्णालयात करत प्राथमिक उपचार करण्यात आले. इतर प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com