

11957
परुळेबाजार ग्रामपंचायतीतर्फे
अंगणवाडी सेविकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १५ ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिला भगिनींचे जास्तीत जास्त फॉर्म भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी परुळे अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ, विनया बोवलेकर, सुजाता देसाई, सुषमा वराडकर यांचा सत्कार केला. योजना जाहीर झाल्यापासून अंगणवाडी सेविकांनी या योजनेसाठी महिलांना परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज भरले. बँक खात्यांची के.वाय.सी. करण्याबाबत माहिती दिली. महिलांशी सातत्याने संपर्क साधून कागदपत्रे पूर्ण केली. या कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.