क्रीडा स्पर्धेत कोसुंब हायस्कूलचे यश

क्रीडा स्पर्धेत कोसुंब हायस्कूलचे यश
Published on

-rat२८p३.jpg-
P२४N१४५८३
संगमेश्वर ः कबड्डी स्पर्धेत यश मिळवणारा कोसुंब हायस्कूलचा संघ.
----------

पावसाळी क्रीडा स्पर्धेत
कोसुंब हायस्कूलचे यश

संगमेश्वर ः तालुक्यातील कोसुंब हायस्कूल येथे झालेल्या १४ वर्षे वयोगट मुलं-मुली पावसाळी कबड्डी स्पर्धांमध्ये श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने सोनावडे हायस्कूलच्या मुलींच्या संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. आता १ ऑक्टोबरला अभ्यंकर हायस्कूल या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने उपविजेतेपद पटकावले. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक राऊत, संस्थाध्यक्ष नामदेव जाधव, क्रीडाशिक्षक कुळये व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
---
धामापूर मार्गावर
झाड कोसळले
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामापूर मार्गावर पेढांबे स्टॉपनजीक रस्त्यावर झाड व माती घसरून आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. मागील दोन दिवसांपासून हे झाड तसेच असून अद्यापही बांधकाम विभागाचे कुणीही फिरकलेले नाही. हा रस्ता रत्नागिरी व गणपतीपुळेकडे जाणारा जवळचा मार्ग असल्याने यावर सतत रहदारी असते तसेच शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. हे झाड वळणमार्गावरच असल्याने समोरून येणारे वाहन तत्काळ दिसत नसल्याने ते ताबडतोब बाजूला करणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने लवकरात लवकर हे झाड बाजूला करून रस्ता रहदारीस सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून होत आहे.
---
गावतळे शाळेला
आदर्श पुरस्कार
गावतळे ः जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कारासाठी गावतळे शाळेने नामांकन दाखल केले होते. मूल्यांकन टीमद्वारे शाळेचे मूल्यमापन होऊन २०२३-२४ चा आदर्श शाळा पुरस्कार गावतळे शाळेला मिळाला. पुरस्काराचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामस्थ, मुख्याध्यापक सत्यप्रेम घुगे व शिक्षकांनी स्वीकारला.
---
दिलीप मराठे यांना
पर्यटनमित्र पुरस्कार

मंडणगड ः निसर्गाचे महत्व अधोरेखित करून मानवी जीवनाला निसर्गाशी जोडण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे मंडणगड तालुक्यातील पर्यावरणप्रेमी दिलीप मराठे यांना जागतिक पर्यटनदिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेच्यावतीने पर्यटनमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठे यांनी विविध ट्रेक आणि सहली यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी आपले योगदान दिले आहे. कोकणासह देशभरातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी सर्वांत उंच असणारे शिखर कळसुबाईदेखील सर केले आहे. जागतिक पर्यटनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी खासदार नीलेश राणे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, माजी आमदार बाळ माने, रमेश कीर आदी उपस्थित होते.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com