वैभवकुमार यांना ''वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड''

वैभवकुमार यांना ''वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड''
Published on

14901

वैभवकुमार यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट’

नवी दिल्लीत सन्मान; ‘मॅजिक फेस्टिव्हल’मध्ये जादूचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता.३० ः नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक फेस्टिव्हल २०२४ मध्ये ओटवणे गावचा सुपुत्र प्रसिद्ध जादूगार वैभवकुमार याने जादूच्या प्रयोगांचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे त्याला ‘वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. वैभवकुमारने या आंतरराष्ट्रीय मॅजिक महोत्सवातून सिंधुदुर्गचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचविले. या दोन दिवशीय फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील सुमारे ४०० हून अधिक नामवंत जादूगार सहभागी झाले.
या फेस्टीव्हलच्या ‘वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड’ या विशेष कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी जगभरातील काही मोजक्याच जादूगारांची निवड करण्यात आली होती. त्यात जादूच्या प्रयोगात अल्पावधीतच नाव कमावलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) येथील सुपुत्र जादूगार वैभवकुमार यांचा समावेश होता. या फेस्टिव्हलमध्ये भारतासह परदेशातील ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, कोरिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, कतार आदी देशांतील नामवंत जादुगारांनी जादूचे प्रयोग सादर केले. वैभवकुमार यांनीही या फेस्टिव्हलमध्ये आपली कला दाखवली. दिल्लीतील जादू संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक खरबंदा यांनी जादुगार वैभवकुमार यांच्याबाबत गौरवोद्दगार काढले. जादूगार वैभवकुमार यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड’ किताब देऊन सन्मानित केले. येत्या फेब्रुवारीमध्ये भारतातील जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जादू संमेलनासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. ‘जादूचा इतिहास व आधुनिक काळातील जादू’ या विषयावरील वैभवकुमार यांचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून, लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com