कणकवलीत ठाकरे गटातर्फे गुरुवारपासून नवरात्रोत्सव

कणकवलीत ठाकरे गटातर्फे
गुरुवारपासून नवरात्रोत्सव
Published on

कणकवलीत ठाकरे गटातर्फे
गुरुवारपासून नवरात्रोत्सव

कणकवली,ता. ३० ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे कणकवली शहरात नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
गुरुवारी (ता.३) सकाळी नऊ वाजता दुर्गामातेचे आगमन होणार असून त्यानंतर घटस्थापना होईल. सायंकाळी सहाला जय भवानी गोंधळी पार्टी कणकवली यांच्यातर्फे ‘देवीचा गोंधळ’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता डबलबारी भजनांच्या सामना लिंग पावना देवी प्रासादिक भजन मंडळ दारिस्ते येथील बुवा रोशन तेली विरुद्ध पडेलकर प्रासादिक भजन मंडळ घालवली देवगड येथील बुवा अखिलेश फाळके यांच्यात होईल. ४ ऑक्टोबरला सकाळी दहाला सहस्त्रनामाचे वाचन आणि सायंकाळी निमंत्रित महिला संघाच्या फुगडीचे आयोजन केले आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा ‘व्यंकटेश पद्मावती’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता कुमारीका पूजन, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महिलांचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होईल. ७ ऑक्टोबरला सायंकाळी सहाला रेकॉर्डडान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com