असलदे-डामरेवाडी येथील धोकादायक वळण कमी करा

असलदे-डामरेवाडी येथील 
धोकादायक वळण कमी करा
Published on

15030

असलदे-डामरेवाडी येथील
धोकादायक वळण कमी करा

असलदे सरपंचांचे ‘बांधकाम’ला निवेदन

कणकवली, ता. ३० : देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी प्रवासी शेड येथील वळण धोकादायक झाले आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांना त्‍याचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. हे वळण कमी करावे, अशी मागणी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे आणि असलदे सोसायटी अध्यक्ष भगवान लोके यांनी केली आहे.
असलदे डामरेवाडी येथील वळणावर नुकताच खासगी बस आणि मोटारीमध्ये अपघात झाला होता. तसेच यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत. येथील वळण कमी करण्याबरोबरच रस्त्यालगतची झाडी हटवावी, अशीही मागणी सरपंच डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com