‘कोरे’ दुपदरीकरणाची मागणी

‘कोरे’ दुपदरीकरणाची मागणी
Published on

‘कोरे’ दुपदरीकरणप्रश्‍नी
आज मुंबईमध्ये बैठक
कणकवली ः अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. याअनुषंगाने मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. मुंबईत उद्या (ता.१) ही बैठक दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. कोकण रेल्वेवरील स्थानकांचा विकास कूर्मगतीने सुरू आहे. तो गतीमान करावा, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करावे, कोकण रेल्वेला थेट अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात अडचण का येते? कोकण रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ आहे. मात्र, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे या महत्वाच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी ही बैठक होणार आहे. या वेळी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, अखिल कोकण विकास महासंघ, निसर्गरम्य चिपळुण संगमेश्वर, जल फाउंडेशन खेड, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी. मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, मराठा ऑर्गनायझेशन, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, वैभववाडी तालुका विकास मंच मुंबई, दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबई, खोक्रल ग्राम विकास मंडळ मुंबई आणि जनजागृती सेवा संस्था आधी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com