

15026
कलमठमध्ये आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न
सरपंच संदीप मेस्री : आरोग्य शिबिरात १३९ जणांची चिकित्सा
कणकवली, ता. ३० : कलमठ गाव आरोग्य संपन्न राहावा. तसेच प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य शिबिर आणि इतर अनेक उपक्रम राबविले जात असल्याची ग्वाही सरपंच संदीप मेस्री यांनी दिली.
कलमठ ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत व लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर झाले. यात गावातील १३९ जणांची आरोग्य चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन सरपंच संदीप मेस्री यांनी केले. यावेळी डॉ. प्रकाश घोगळे, डॉ. योगेश केंद्रे, डॉ. संजय जोशी, डॉ. ऐश्वर्या जगताप, डॉ. नीलेश मेत्रे या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच उपस्थित सर्व रुग्णांची हृदयरोग, कर्करोग, नेफ्रोलोजी, दंतरोग, अस्थीरोग, रक्त, थायरॉईड, मधुमेह, इसीजी, आदी तपासण्या मोफत केल्या. उपसरंच स्वप्निल चिंदरकर, दिनेश गोठणकर, नितीन पवार, सुप्रिया मेस्री, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, इरफान शेख, विकास लुडबे, विष्णू गोसावी, रितेश घाडीगावकर, तेजस लोकरे, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, स्वाती सावंत, भावना चिंदरकर, मनीषा परब, अमजद शेख, शर्वरी जाधव, पूर्वा धुरी, क्षितिजा कदम, विभावरी कांबळे, ज्योत्स्ना गुडेकर उपस्थित होते. डॉक्टर आणि सहकाऱ्यांचे स्वागत संदीप मेस्री यांनी केले. ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.