सरस्वती विद्यामंदिर, जनता विद्यालय विजयी

सरस्वती विद्यामंदिर, जनता विद्यालय विजयी
Published on

- rat३०p१०.jpg-
२४N१५०५६
राजापूर ः सरस्वती विद्यामंदिर पाचल शाळेच्या विजेत्या संघासमवेत राजापूर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील क्रीडाशिक्षक.

सरस्वती, जनता विद्यालय विजयी

राजापुरातील तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० : तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुले सरस्वती विद्यामंदिर (पाचल) व मुलींमध्ये निर्मला भिडे जनता विद्यालय (कोंड्ये) यांनी विजेतेपद पटकावले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, पंचायत समिती संचलित राजापूर तालुका क्रीडाशिक्षक व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्यावतीने तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालय आणि जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयात नुकत्याच शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. या वेळी आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, प्रा. देवकर, जुवाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक गोवळकर, क्रीडाशिक्षक सूर्यवंशी यांच्यासह राजापूर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष विजय पाटील, क्रीडा समन्वयक व्यंकट नालापल्ले, उपाध्यक्ष विकास कुंभार, सचिन रावण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद शिवणेकर यांच्यासह शिक्षकवृंद, क्रीडाशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगट मुलगे आचार्य नरेंद्र विद्यामंदिर (भू) आणि मुलींमध्ये आचार्य जावडेकर विद्यालय (विलये) विजयी झाला. १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सरस्वती विद्यामंदिर (पाचल) व मुलींमध्ये देसाई विद्यामंदिर (कुंभवडे), १९ वर्षे वयोगटात मुले सरस्वती विद्यामंदिर (पाचल) व मुलींमध्ये निर्मला भिडे जनता विद्यालय (कोंड्ये) या प्रशालेच्या संघांनी विजेतेपद पटकावले. सर्व विजेत्या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्व विजेत्या संघांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com