

-rat३०p२१.jpg-
24N15104
संगमेश्वर ः संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था.
---------------
रस्ता नाही तर विधानसभेला मतदानही नाही
संभाजीनगरमधील ग्रामस्थ संतप्त; मतदानावर बहिष्काराचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः शांततामय व संविधानिक मार्गाने आतापर्यंत निवेदन देऊन रस्ताकामाच्या अनुषंगाने काहीच हालचाली न झाल्याने संगमेश्वर येथील संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्ता नाही तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार, असा निर्णय घेतला आहे.
सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन आत्तापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडून असलेला व संगमेश्वर येथील संभाजीनगरकडे जाणारा अवघ्या पाचशे मीटर अंतराचा असलेला हा रस्ता लाल मातीचा कच्चा रस्ता असून, या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. लहान-मोठे दगडधोंडे पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे पडलेल्या चरींनी या सर्वांमुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे. सुमारे पाचशेपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या संभाजीनगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे; मात्र वस्तीतील लोकांना तसेच वसतिगृहातील मुलांना या एकमेव रस्त्याशिवाय अन्य पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे सहा दशकांपासून याच जीवघेण्या व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरूनच वाहनाने किंवा पायी प्रवास करणेच नशिबी आहे. शाळेत जाणारी लहान मुले, रुग्ण, वयोवृद्ध यांचे तर या रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहेत.
गेल्या साठ वर्षात अनेक सरकारे आली, अनेक राज्यकर्ते होऊन गेले; मात्र आजपर्यंत या सर्वांकडे पक्का रस्ता व्हावा यासाठी अर्जविनंत्या करण्यात आल्या; परंतु या अर्ज आणि विनंत्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे आता येथील लोकांनी रस्ताप्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय झालेल्या बैठकीत घेतला. आता आश्वासन नको तर रस्ता हवा, रस्ता नाही तर मतदान नाही, असा इशारा येथील अशोक जाधव, कृष्णा भोई, आकाश जाधव आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.
------
चौकट
निवडणुकीत नेते येतात धावत
एवढेच नव्हे तर या वस्तीत सुमारे ३५० मतदार असून निवडणुका आल्या की, सर्वच पक्षांचे पुढारी आणि नेते या वस्तीकडे येतात. ही मते पदरात पाडून घेण्यासाठी रस्ताप्रश्न मार्गी लावू, असे गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ नुसते आश्वासनच पदरी पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.