

‘लतादीदी’ संगीत स्पर्धेत
गायत्री जोशी तृतीय
संगमेश्वर ः कसबा येथील गायत्री जोशी यांनी ‘सूरवर्धन’ आयोजित लतादीदी २०२४ सुगम संगीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. गायत्री जोशी म्हणजे पूर्वाश्रमीच्या आश्विनी आपटे यांनी या स्पर्धेत ग्रुप १ मधील ५० वर्षापर्यंतच्या गटात ‘खेळ मांडीयेला वाळवंटी.....’ हा भूप, नट रागातील संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करून ही यशस्वी कामगिरी केली आहे. त्या सध्या देवरूख येथे नवोदित गायकांसाठी गायनाचे वर्ग घेत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाचे त्यांच्या गुरू निहाली गद्रे आणि अभिनेत्री गात यांनी अभिनंदन केले.
----------
देवरूख शाळा
जिल्हास्तरावर दुसरी
साडवली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. १ मध्ये देवरूख हायस्कूलने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. रत्नागिरीतील मराठा भवन येथे झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र व पाच लाखाचा धनादेश देऊन शाळेचा गौरव करण्यात आला. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, शिरीष फाटक, शाळा समिती अध्यक्षा नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहशालेय उपक्रम, स्वछता, आरोग्यविषयक कार्यक्रम अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. या पुरस्कार वितरणाला मुख्याध्यापक मधुकर कोकणी, पर्यवेक्षक अनंतकुमार मोघे, साहाय्यक शिक्षक किरण देशपांडे, भरत धनपाल, आनंद पर्शराम, ग्रंथपाल मनोहर गीते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.