

-ratchl305.jpg
15156
चिपळूण : पोलिस ठाण्यातील बैठकीला उपस्थित नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी.
डीजेसह लेझर लाईटचा वापर नको
पोलिसांच्या सूचना; चिपळुणात नवरात्रोत्सवाबाबत मंडळांची बैठक
चिपळूण, ता. ३० ः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तालुक्यातील नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नवरात्रोत्सवात डिजेसह लेझर लाईटचा वापर करू नका, अशा सक्त सूचना दिल्या.
नवरात्रोत्सवानिमित्त तालुक्यात ग्रामदैवतांच्या मंदिराप्रमाणेच शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना होत असल्याने त्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांत डीजे तसेच लेझर लाईटचा वापर केल्याने त्याचे आरोग्यावर भीषण परिणाम झाल्याच्या घटना राज्यातील विविध भागांत घडल्या आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मंडळांना सूचना देताना पोलिस निरीक्षक मेंगडे म्हणाले, नवरात्रोत्सव साजरा करताना डिजेसह लेझर लाईटचा वापर करू नये. शिवाय प्रत्येक मंडळाने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रात्री १० नंतर कोणत्याही कार्यक्रमासाठी ध्वनिक्षेपक लावला जाऊ नये. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे प्रकार टाळून नवरात्रोत्सव शांततेत साजरा करावा. तालुक्यात एकूण १७ नवरात्रोत्सव मंडळे असून त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.