-चिपळुणात जल्लोष लोककलेचा महोत्सव

-चिपळुणात जल्लोष लोककलेचा महोत्सव
Published on

-ratchl३०२.jpg -
२४N१५१५५
चिपळूण ः महोत्सवाची माहिती देताना बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी.
--------------
चिपळुणात ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव

नंदकिशोर जुवेकर ः कोकणातील लोककला रंगणार; दिंडीने प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असणाऱ्या बालरंगभूमी परिषद आयोजित आणि बालरंगभूमी परिषद शाखा, रत्नागिरी संयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ४ व ५ ऑक्टोबर असे दोन दिवस हा महोत्सव होणार आहे. रत्नागिरी शाखा संयोजक असलेल्या या कार्यक्रमात नृत्य, वादन व गायन अशा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांच्या बालकलाकारांची स्पर्धा होणार असून, विजेत्यांना रोख रक्कम व अन्य पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ४ व ५ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजल्यापासून लोककलेचा जल्लोष सुरू होईल. तत्पूर्वी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची चिपळूण पालिका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशी दिंडी काढण्यात येईल. या महोत्सवात समूहनृत्य, समूह गायन, एकल गीत, एकल नृत्य, एकल वाद्य वादन अशा स्पर्धांचा महोत्सव रंगणार आहे. रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष नंदू जुवेकर, कार्याध्यक्ष ओंकार रेडीज यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचेही महत्वाचे सहकार्य या महोत्सवाच्या आयोजनात असून स्थानिक शिक्षण विभागासह चिपळूण पालिकेचे सहकार्य लाभत आहे. जिल्ह्यातील रंगकर्मी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष ओंकार रेडीज, खजिनदार शौकतअली गोलंदाज, सीमा कदम, नाट्य परिषदेचे दिलीप आब्रे, मंगेश बापट आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com