रत्नागिरी - अस्वच्छतेमुळे ५१ दुकानंदारांवर दंडात्मक कारवाई

रत्नागिरी - अस्वच्छतेमुळे ५१ दुकानंदारांवर दंडात्मक कारवाई
Published on

अस्वच्छतेमुळे ५१ दुकानदारांना दंड

अन्न व औषध प्रशासन; सुधारणा न केलेल्या ६ जणांचे परवाने निलंबित

दृष्‍टिक्षेप
* एकूण परवानाधारक- ५६ लाख २३ हजार
* नूतनीकरण शुल्कातून महसूल- १७ लाख ६६ हजार रुपये
* दंडातून वसुली- ३ लाख ६६ हजार १०० रुपये

रत्नागिरी, ता. ३० : ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ व उत्पादने मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेवर भर देत काही आस्थापनांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. अस्वच्छता ठेवणाऱ्या ५१ परवानाधारकांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे; तर त्रुटींमध्ये सुचवलेल्या सुधारणा न करणाऱ्या १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जणांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत.
रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये ही कारवाई केली आहे. जिल्ह्याची जबाबदारी असताना या विभागाच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे, तरी चांगल्या पद्धतीने या विभागाची कारवाई सुरू आहे. पंधराच्यावर कामगार असलेल्या परवानाधारक आस्थापनेमध्ये संबंधित कामांचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागाकडून तेथील कामगाराला प्रशिक्षित केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकाशी कसे वागावे, कसे बोलावे, स्वच्छता कशी ठेवावी आदी धडे यामध्ये दिले जात आहेत. ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ आणि उत्पादने मिळावीत हा यामागील मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे ५६ लाख २३ हजार परवानाधारक आहेत. त्यांनी दिलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या नूतनीकरणातूनच या विभागाला उत्पन्न मिळते. परवाना नूतनीकरणाच्या शुल्कातून १७ लाख ६६ हजार ५०० एवढा महसूल मिळवला आहे. या विभागाकडून झालेल्या तपासणीत अस्वच्छता ठेवलेल्या ५१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार १०० एवढा दंड वसूल केला आहे. अस्वच्छता आढळून आलेल्या आस्थापनेला या विभागाने सुधारणा सुचवल्या होत्या त्या पूर्ण न केलेल्या १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारणे दाखवा नोटीस देऊनही सुधारणा न केलेल्या ६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
------------

कोट...
अन्न व औषध प्रशासनाने आस्थापनांची तपासणी करून काहींना दंड केला, तर काहीचे परवाने निलंबित केले आहेत. महिन्याभरासाठी हे परवाने निलंबित केले आहेत. ही कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे तर परवाना नूतनीकरणातून साडेसतरा लाखांचे उत्पन्न या विभागाला मिळाले आहे.
- दीनानाथ शिंदे, अन्न प्रशासन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com