कसालमध्ये आज
स्वच्छता मोहीम

कसालमध्ये आज स्वच्छता मोहीम

Published on

कसालमध्ये आज
स्वच्छता मोहीम
सिंधुदुर्गनगरी ः ''स्वच्छता ही सेवा २०२४''अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून उद्या (ता. २) ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कसाल (ता. कुडाळ) येथे जिल्हास्तरीय परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सकाळी ८.३० ते ९ वाजता जिल्हा मुख्यालय ते कसाल हायस्कूलपर्यंत रॅली, सकाळी ९ ते ९.३० वाजत मान्यवरांचे स्वागत व मनोगत, ९.३० ते १० वाजता शालेय मुलांचे मनोगत व वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण, १० ते १०.१५ वाजता स्वच्छता शपथ, १०.१५ ते ११.३० यावेळेत रॅली व परिसर स्वच्छता कार्यक्रम, ११.३० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकूर यांनी दिली.

नोंदणीकृत सोसायट्यांना
प्रस्ताव देण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव गुरुवारपर्यंत (ता. ३) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय येथे स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. पा. चिमणकर यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने १० लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झाली आहेत. आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली व अपूर्ण स्वरुरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्वीकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.