कणकवली : मराठे सत्‍कार

कणकवली : मराठे सत्‍कार
Published on

15482

लायन्स क्‍लबच्यावतीने
भालचंद्र मराठे यांचा सत्‍कार
कणकवली, ता. ३ : लायन्स क्‍लब कणकवलीच्यावतीने ज्‍येष्‍ठ नागरिक दिनाच्या औचित्‍यावर सिंधुदुर्ग जिल्हा ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे यांचा सत्‍कार करण्यात आला. लायन्स क्‍लबचे माजी अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण म्‍हाडेश्‍वर आणि डॉ.प्रवीण बिरमोळे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन हा सत्‍कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी लायन्स क्लबचे कणकवली अध्यक्ष डॉ. अशोक कदम, सचिव प्रा. दिवाकर मुरकर, शामसुंदर महाडेश्वर, महेश काणेकर, दादा कोरडे, डॉ. सिद्धार्थ तांबे इत्यादी उपस्थित होते.
अशोक कदम म्‍हणाले की, भालचंद्र मराठे यांचे आज ८४ एवढे वय असूनही ते ज्‍येष्‍ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तळमळीने काम करत आहेत. भालचंद्र मराठे म्‍हणाले की, जिल्ह्यातील अडीच लाख ज्‍येष्‍ठ नागरिकांच्या वतीने मी हा सत्कार नम्रपणे स्विकारतो. शासन स्तरावर ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली ज्‍येष्‍ठ नागरिक राज्यमंत्री पद निर्माण करून ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लावायला हवेत. त्‍यासाठी लायन्स क्‍लबसह सर्वांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. प्रस्ताविक प्रा. दिवाकर मुरकर, तर आभार डॉ. प्रविण बिरमोळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com