''नारीरत्न'' राज्य पुरस्काराने संजना सावंत यांचा गौरव

''नारीरत्न'' राज्य पुरस्काराने संजना सावंत यांचा गौरव
Published on

15563

‘नारीरत्न’ राज्य पुरस्काराने
संजना सावंत यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील कुपवडे येथील संजना सावंत यांना नुकताच जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय ‘नारीरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्यामार्फत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवणकाम, ब्युटीपार्लर प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल संजना सावंत याना निमंत्रित केले होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीरत्नांना आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याला काबरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी सुरेश पाटील, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संदिपा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, कृषितज्ज्ञ विजय पराग, सेवानिवृत्त जेलर जी. के. गोपाळ (नाशिक), ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे (छत्रपती संभाजीनगर), सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक परदेशी, ज्येष्ठ शिक्षिका शारदा भामरे (नाशिक), सामाजिक कार्यकर्ते संजीव ढवळे, तुलसीदास इंगळे (नाशिक), कविता पाटील, उपाध्यक्ष युवराज पाटील आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com