स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची आजपासून ठेवयोजना

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची आजपासून ठेवयोजना
Published on

‘स्वरूपानंद पतसंस्थे’ची ठेवयोजना सुरू

अॅड. पटवर्धन ः दहा कोटींचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३: स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ आज पासून झाला. या महिन्यात १० कोटींच्या ठेवी संकलित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
संस्थेने ३२५ कोटींच्या ठेव संकलनाचा टप्पा पार केला आहे. १७ शाखांमध्ये ५० हजारच्या पुढे असलेल्या ठेव खात्यांमधून हा ठेवींचा टप्पा गाठला आहे. विश्वासार्हता, शिस्त, पारदर्शकता, उत्तम ग्राहकसेवा आणि सहकारतेचा दृष्टिकोन सर्वतोपरी ठेवून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था काम करत आली आहे. त्यामुळे मोठा ग्राहकवर्ग संस्थेशी जोडला गेल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले.
पतसंस्थेने ४७ कोटींचा स्वनिधी, १४६ कोटींच्या उत्तम गुंतवणुका, ९९.३२ टक्के वसुली, २८ टक्के भांडवल पर्याप्तता, सातत्याने प्राप्त होणारा ''अ'' लेखापरीक्षण वर्ग कायम ठेवला आहे. ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व सुरक्षित गुंतवणुकीचे लाभार्थी होण्यासाठी ठेव योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com