

15590
वागदे येथे जनावरांना रेडीयम बेल्ट
कणकवली, ता. ३ः महामार्गावर किंवा रस्त्यावर उभा असणाऱ्या जनावराचे अपघात होता. यामुळे वाहनांचे आणि जनावरांचे नुकसान होते. त्यामुळे वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांच्या जनावरासाठी रेडीयम बेल्टचे वाटप केले आहे.
वागदे ग्रामपंचायतचा हा अभिनव उपक्रम पत्रकार गिरीश परब यांच्या संकल्पनेतून वागदे गावात राबविण्यात आला आहे. या गावातून महामार्ग जातो. या माहामार्गावर जनारांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी काही जनावरे रस्त्यावर किंवा महामार्गार उभी असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी जनावरांचे अपघात टाळण्यासाठी वागदे ग्रामपंचायततर्फे शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांसाठी रेडीयम बेल्ट देणेस सुरुवात केली. जेणेकरून रस्त्यावरून रात्री जाताना वाहन चालकांना लांबूनच रेडीयम दिसून अपघात टाळाता येवू शकतो. आज पासून गावातील शेतकऱ्यांना बेल्ट देणेस सुरुवात झाली. वागदे सरपंच संदीप सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर घाडीगावकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम यांच्या उपस्थितीत गावाती शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांसाठी गळ्यात हा रेडीयम बेल्ट घालने बंधनकारक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.