

नवरात्र उत्सवानिमित्त
नेमळेत भजन कार्यक्रम
सावंतवाडीः येथील देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणार्या कार्यक्रमात गावातील २४ भजन मंडळानी सहभाग घेतला असून गावाबाहेरील पाच भजने आयोजकांनी निमंत्रित केली आहेत. एकूण एकोणतीस भजने नवरात्रोत्सव कार्यक्रमात होणार आहेत. शेवटच्या दिवशी दांडिया नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. हा भजनाचा कार्यक्रम ३ ते ८ ऑक्टोबरला होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन गावकर, नवरात्रोत्सव मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.
------------
वेतोरे सातेरी मंदिरात
सोमवारी घुमट आरती
वेंगुर्लेः वेतोरे येथील देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सव २०२४ अंतर्गत तेथील सातेरी मंदिर हौशी मित्रमंडळातर्फे ७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता गोव्यातील प्रसिद्ध साई दामोदर आरती मंडळ, मडगाव-गोवा येथील ''व्हाईस ऑफ गोवा नॅशनल अॅवॉर्ड २०१६'' विजेते गायक शुभम नाईक यांचा घुमट आरती व गायन कार्यक्रम आयोजित केला आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवी सातेरी मंदिर हौशी मित्रमंडळाने केले आहे.
------------
वेंगुर्लेत आजपासून
विविध कार्यक्रम
वेंगुर्लेः वेंगुर्ले ग्रामदेवता श्री सातेरी मंदिरात ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त उद्या (ता. ३) सकाळी ९ वाजता घटस्थापना आणि उत्सवाची सुरुवात, ३ ते १० ऑक्टोबर या कालावधीत रोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत अभंग, भक्तिगीत गायन, संगीत व वारकरी भजने आणि आरती, १० ला रात्री ११ वाजता दिंडी प्रदक्षिणा, महाआरती व तीर्थप्रसाद, ११ ला सकाळी १० वाजता नवचंडी होमहवन, पूर्णाहुती व त्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.
-------------
नवरात्रोत्सवानिमित्त
शिरशिंगेत कार्यक्रम
सावंतवाडीः शिरशिंगे-गोठवेवडी येथील दुर्गामाता तरुण मंडळातर्फे ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त उद्या (ता. ३) सायंकाळी दुर्गामातेच्या मूर्तीचे पूजन व त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. उत्सव काळात दररोज सकाळी देवीच्या मूर्तीचे पूजन व त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक तसेच निमंत्रित भजने, दांडिया, फुगड्या, दशावतारी नाटक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. दुर्गामातेच्या मूर्तीचे १२ ला सायंकाळी वाजतगाजत मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
--------------
रेडीत आजपासून
नवरात्र उत्सव
सावंतवाडीः श्री देव ब्राह्मण नवरात्र उत्सव मंडळ रेडी-म्हारतळेवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, दांडिया, गरबा, फुगडी, भजन तसेच रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या (ता. ३) रेडी सरपंच रामसिंग राणे, माजी आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, पंचायत समिती माजी सदस्य मंगेश कामत, उपसरपंच नमिता नागोळकर, तंटामुक्त अध्यक्ष गोपाळ राऊळ यांच्या उपस्थित होणार आहे. यात पाककला स्पर्धा, खास आकर्षण शुभम धुरी यांचा ''खेळ पैठणीचा'', लहान मुलांसाठी फन्सी ड्रेस स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी नंदकुमार मांजरेकर व नीलेश पांडजी यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.