आरक्षणाच्या मारेकऱ्यांनीच रॅली काढणे हास्यास्पद

आरक्षणाच्या मारेकऱ्यांनीच रॅली काढणे हास्यास्पद
Published on

15637

आरक्षणाच्या मारेकऱ्यांनीच रॅली काढणे हास्यास्पद
इर्शाद शेख ः कणकवली भाजपवर टिका
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः आरक्षणाच्या मारेकऱ्यांनीच आरक्षण बचाव रॅली काढावी हा मोठा विनोद आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भाजपने कणकवली येथे शनिवारी (ता. ५) आयोजित केलेल्या आरक्षण बचाव रॅलीवर भाष्य करताना केली.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी कणकवलीत शनिवारी भाजपच्यावतीने आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. मुळात श्री. गांधी हे अमेरीकेत नक्की काय म्हणाले हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांना अमेरीकेत ज्यावेळी आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ''ज्यावेळी देशातील जातीभेद नष्ट होईल, समाजातील सर्व घटकांना समान हक्क व न्याय मिळेल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. सद्या ती परिस्थिती भारत देशात नाही. याचाच अर्थ जोपर्यंत जातीभेद नष्ट होत नाही, समाजातील सर्व घटकांना समान हक्क व समान न्याय मिळत नाही, तोपर्यंत भारतातील आरक्षण संपुष्टात येणार नाही.'' हीच भूमिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. अमेरिकन भाषा ही इंग्रजी असल्यामुळे आणि प्रश्न विचारणाऱ्याने इंग्रजीत प्रश्न विचारल्यामुळे गांधी यांनी इंग्रजीत उत्तर दिले. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना गांधी हे इंग्रजीत नक्की काय म्हणाले हे कळले नसेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नितीन गडकरींसारख्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांकडून भाषांतर करून घेतले असते तर त्यांना गांधी यांच्या विरोधात आरक्षण बचाव आंदोलन करण्याची आवश्यकता भासली नसती.
मुळात भाजप हा कायम आरक्षण विरोधी राहिला आहे. म्हणूनच केंद्रात गेली दहा वर्षे सत्ता असून जातीगत जनगणना करत नाही. भाजप हाच खरा आरक्षणाचा मारेकरी आहे आणि म्हणून भाजपच्या नेत्यांनी आरक्षण बचाव रॅली काढणे हाच मोठा विनोद आहे, अशी प्रतिक्रिया श्री. शेख यांनी दिली आहे.
श्री. शेख पुढे म्हणाले, "गांधी जातीगत जनगणना होण्यासाठी संसदेत संघर्ष करतात, समाजातील वंचित घटकांना समान हक्क व न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका असते. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव मोहीम नाही तर समाजातील सर्व घटकांना समान हक्क व न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे आणि भारताचे संविधान सुद्धा हेच सांगते. त्यामुळे देशातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला गांधींची भूमिका माहीत आहे. त्यामुळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून विधानसभेत फायदा मिळवण्यासाठी अशी रॅली कोण काढत असेल तर जिल्ह्यातील जनता त्याला बळी पडणार नाही. तुमचा हेतू जिल्ह्यातील जनता चांगल्या प्रकारे समजून चुकली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com