आयएएस, आयपीएससाठी झोकून देऊन काम करा

आयएएस, आयपीएससाठी झोकून देऊन काम करा
Published on

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात स्वतःला झोकून द्या

डॉ. नरेशचंद्र काठोळे ः ज्ञानदीपमध्ये कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ ः आयएएस, आयपीएस तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला अभ्यासामध्ये झोकून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मिशन आयएएस या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले.
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे-बोरज येथे ‘मी आयएएस अधिकारी होणारच’ या विषयावर एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. ज्ञानदीप महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच भविष्यातील करिअरसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच भाग म्हणून ज्ञानदीप महाविद्यालय व मिशन आयएएस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिशन आयएएस या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे उपस्थित होते. प्रा. डॉ. काठोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा तसेच आयएएस अधिकारी बनण्यासाठी आत्मसात करावयाच्या महत्वाच्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com