कणकवली शहरातील ‘त्‍या’ बॅनरची चर्चा

कणकवली शहरातील ‘त्‍या’ बॅनरची चर्चा
Published on

15809

कणकवली शहरातील ‘त्‍या’ बॅनरची चर्चा
राणेंना टक्‍कर देणाऱ्या ‘त्‍या’ उमेदवाराची उत्‍सुकता
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी’ असा बॅनर लावण्यात आला आहे. कणकवली विधानसभा व त्याखाली मशाल चिन्ह अशा आशयाचा बॅनर लावला गेला आहे. हा बॅनर ठाकरे गटाकडून लावला गेला असल्याचे प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्याची अधिकृत जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. त्‍यामुळे आमदार नितेश राणे यांना हा इशारा देणारा बॅनर नेमका लावला कुणी ? तसेच राणेंना टक्‍कर देण्यासाठी नेमका कुठला नेता निवडणूक रिंगणात उतरणार याची मोठी उत्‍सुकता आणि त्‍या बॅनरची चर्चा कणकवली शहरात होती.
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तीन प्रबळ दावेदार आहेत. तर काँग्रेस पक्षानेही कणकवली मतदारसंघात आपला दावा केला आहे. त्‍यामुळे कणकवली मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढली आहे. तर भाजपकडून नितेश राणे हे उमेदवार निश्चित आहेत. राणेंच्या ताकदीपुढे विरोधकांचा टिकाव लागणे शक्‍य नाही अशी चर्चा असताना आता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थेट बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्‍न केला आहे.
राज्‍यातील मतदारसंघ निहाय उमेदवार निश्‍चितीसाठी मातोश्रीवर मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकी झाला. यात कणकवलीसाठीच्या उमेदवाराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र प्रबळ तीन दावेदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर अशा आशयाचा बॅनर लावला गेला. पक्षांतर्गत कुरबुरीतून हा बॅनर लावला गेला असावा अशीही चर्चा शहरात होती. विना परवाना असलेला बॅनर पोलिसांनी काढून टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com