कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी रस्त्याची ग्रामस्थांकडून डागडुजी

कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी रस्त्याची ग्रामस्थांकडून डागडुजी
Published on

15810

कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी
रस्त्याची ग्रामस्थांकडून डागडुजी
डांबरीकरण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा
कणकवली, ता. ३ : तालुक्यांतील कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी जाणाऱ्या रस्त्याची गावकरवाडी ग्रामस्थांकडून साफसफाई तसेच रस्त्यावर आलेली खडी बाजूला करुन डागडुजी करण्यात आली. या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्‍यास पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
कळसुली गावातील भोगनाथवाडी ते गावकरवाडी हा रस्ता रहदारीचा आहे. दुचाकी, तीन चाकी आणि इतर वाहने या मार्गावरून ये जा करत असतात. गेली अनेक वर्षे मागणी करूनही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असतात. त्‍यामुळे नागरिकांना अखेर पुढे येऊन रस्त्याची डागडुजी करावी लागत आहे. यंदा या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्‍यास येत्‍या विधानसभा तसेच अन्य निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गांवकर वाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
या रस्त्याची डागडुजी गावकरवाडीतील संजय नेरूरकर, स्वप्निल नेरुकर, भाऊ वायंगणकर, अरुण घाडीगावंकर, प्रथम घाडीगावंकर, तुकाराम घाडीगावंकर, ज्ञानदेव घाडीगावंकर, सचिन घाडीगावंकर, किशोर घाडीगावंकर, प्रमोद घाडीगावंकर, मामा मेस्त्री, निलेश घाडीगावंकर, नवसोबा घाडीगावंकर, सुभाष घाडीगावंकर, संतोष घाडीगावंकर, सुरेश घाडीगावंकर, दत्ताराम घाडीगावंकर, समीर वायगंणकर, किशोर घाडीगावंकर, धाकू घाडीगावंकर, सत्यविजय वायगंणकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com