मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल विजयी

मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल विजयी
Published on

rat३p५.jpg-
P२४N१५७९६
रत्नागिरी ः मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरीचा हॉकीचा विजय संघ आणि प्रशिक्षक.

‘मराठा मंदिर देसाई’ हायस्कूल विजयी

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा; १७ व १४ वर्षाखालील मुलींचे यश

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या १७ आणि १४ वर्षांखालील मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावले.
साडवली (देवरूख) येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. जिल्ह्यातील १३ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. हॉकी स्पर्धेत १५ वर्षांपूर्वी देसाई प्रशालेचे वर्चस्व होते. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत यश मिळवल्यामुळे मराठा मंदिर संस्थेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने प्रशालेमध्ये हॉकीचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यामध्ये हॉकी खेळाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका दळी यांनी समाधान व्यक्त केले. १४ वर्षांखालील मुलींचा सामना देवरूख शाळा क्र. ४ यांच्याबरोबर झाला. या सामन्यात देसाई हायस्कूलने एका गोलची आघाडी घेत पदार्पणातच विजयाची मोहर उमटवली तर १७ वर्षांखालील संघाला प्रतिस्पर्धी संघ नसल्याने त्या संघाला विजयी संघ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर १७ वर्षांखालील व १४ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही संघाची निवड विभागीय हॉकी स्पर्धेसाठी झाली आहे. दोन्ही हॉकीचे संघ तयार करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक संतोष गार्डी यांचे योगदान आहे. त्यांच्यामुळे आणि प्रशालेतील इतर सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हॉकी संघ तयार झाला, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्याबरोबर प्रशिक्षक सुशांत पवार, जीवन जाधव, सचिन मटकर, विकास साळवी, अजय कांबळे, आदित्य शिवगण यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com