गुरूमाऊली पतसंस्थेत २५ कोटी ठेवी जमा

गुरूमाऊली पतसंस्थेत २५ कोटी ठेवी जमा
Published on

- rat३p७.JPG-
P२४N१५८२६
सावर्डे : गुरूमाऊली पतसंस्थेच्या सभेत मार्गदर्शन करताना ज्ञान सागर. सोबत अशोक थेराडे, शांताराम थेराडे, आत्माराम धावडे आदी.

‘गुरूमाऊली’संस्थेचे २५ कोटी ठेवींचे उद्दिष्ट

अशोक थेराडे ः वार्षिक सर्वसाधारण सभा

सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३ : गुरूमाऊली पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात २५ कोटी ठेवी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद, संस्था कर्मचारी व संचालकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अध्यक्ष अशोक थेराडे यांनी केले.
सावर्डेतील गुरूमाऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी संस्थेतील गुणवंत कर्मचारी प्राची वाघे, सूरज खापरे, अनिकेत शिंदे, अमोल गुरव, सिद्धेश जाक्कर, सोहम गुजर यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ सभासद म्हणून श्रीपत काजवे यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले, संस्थेला मागील आर्थिक वर्षात २२ कोटी ५७ लाख रुपये नफा झाला आहे. अहवाल सालात ठेवीत ७६ लाख ४७ हजार रुपयांची वाढ होऊन १९ कोटी ५९ लाख रुपयेएवढी ठेव जमा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com