रक्तदाता दिनानिमित्त रत्नागिरीत जागृती फेरी

रक्तदाता दिनानिमित्त रत्नागिरीत जागृती फेरी
Published on

- rat३p८.JPG-
२४N१५८३३
रत्नागिरी ः रक्तदाता दिनानिमित्त रत्नागिरीत काढलेल्या जागृती फेरीत सहभागी परिचारिका
---------
रक्तदाता दिनानिमित्त रत्नागिरीत जागृती फेरी

आरोग्य विभाग ; परिचारिकांचा सहभाग, ९० टक्के रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिवसानिमित्त शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्यावतीने राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत जनजागृती फेरी काढण्यात आली.
रत्नागिरीत काढलेल्या या फेरीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक अरूण कुमार जैन, यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी, शिर्के हायस्कूलचे प्राध्यापक, स्काउट गाइडचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. या प्रसंगी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुतार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना रक्तपेढी केंद्राच्या कामाचे स्वरूप व वार्षिक रक्त संकलन आणि रक्तपुरवठा याची माहिती दिली. रक्तपेढी केंद्रामार्फत ९० टक्के रुग्णांना वार्षिक रक्तपुरवठा मोफत केला जातो. रक्तविघटन केंद्राची माहिती त्यांनी सर्वांना दिली. रक्तदानाचे फायदे सांगून रक्तदात्यांमधील भीती व शंका दूर केल्या. त्यानंतर रक्तदानाविषयी सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी रक्तदान शपथ घेतली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी रक्तदान करण्यास या, असे आवाहन केले.
-----
चौकट
पथनाट्य, ढोलपथक ठरले लक्षणीय

रत्नागिरी शहरातील बसस्थानक येथे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच शिर्के हायस्कूलच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांचे ढोलपथक या फेरीचे विशेष आकर्षण ठरले. फेरी समाप्तीवेळी विनोद पावरा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com