

15853
महात्मा गांधी, शास्त्रींना सावंतवाडीत वंदन
स्वच्छता मोहिमेसही प्रतिसादः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. इतरांना कोणताही उपदेश करताना त्याची सुरुवात प्रथम स्वतःपासून करावी, ही त्यांनी दिलेली शिकवण विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सहायक शिक्षिका श्रावणी प्रभू यांनी महात्मा गांधींविषयी माहिती सांगितली. महात्मा गांधीजींचे साधे राहणीमान, स्वावलंबन, त्यांची उच्च विचारसरणी या त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यात आले. तर, शालेय सहा. शिक्षिका निधी सावंत यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सादर केली. यामध्ये लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यांनी जनतेला दिलेली शिकवण म्हणजेच ''सर्वधर्म समभाव'' यामागील उद्देश माहितीद्वारे स्पष्ट करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून महात्मा गांधीजींचे ''रघुपती राघव राजाराम'' हे भजन म्हटले. स्काऊट-गाईड अंतर्गत दुसरीतील ''कब-बुलबु''लच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबविला. पुढील दहा दिवसांसाठी स्काऊट-गाईडतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ''वैष्णव जन तो'' हे भजन शांतीसाठी पदयात्रा, बसस्थानक व देवालयांची स्वच्छता, गांधीदर्शन, वेशभूषा स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांना प्रशालेतील स्काऊट-गाईड शिक्षिका सुषमा पालव यांनी मार्गदर्शन केले. ''रघुपती राघव राजाराम'', ''वैष्णव जन तो'' या गांधीजींच्या सर्वधर्म प्रार्थना, भजने का म्हटली जातात, या मागचा उद्देश त्यांनी विद्यार्थांना समजावून सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.