

15840
महात्मा गांधी जयंतीदिनी
बांद्यात स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ः ''स्वच्छता ही सेवा'' या अभियानअंतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पीएम श्री बांदा क्र. १ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी येथील सार्वजनिक बसस्थानक परिसराची साफसफाई केली.
सुरुवातीला शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा उलगडा आपल्या भाषणातून केला. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या जीवन कार्यावर आधारित नाट्य सादर केले. यावेळी स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची लक्षवेधी वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली. बांदा केंद्रशाळेतील स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत येथील सार्वजनिक ठिकाणी असेलेल्या बसस्थानक परिसराची साफसफाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, स्काऊटर शिक्षक जे. डी. पाटील, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षिका शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, रेश्मा देसाई, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.