

-rat२p३.jpg-
P२४N१५४५७
रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत नेमबाजीमध्ये यश मिळवणारे पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमीचे खेळाडू.
------
नेमबाजीमध्ये ‘पुष्कराज स्पोर्ट्स’चे यश
जिल्हास्तरीय स्पर्धा ; २६ जणांची विभागासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अॅकॅडमीमधील विविध शाळातील २१ विद्यार्थ्यांनी नेमबाजीमध्ये विविध पदके प्राप्त केली. डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकूल येथे स्पर्धा झाली.
यामध्ये भारतीय नेमबाज व भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यताप्राप्त ग्रेड ए शूटिंग कोच राजेश्वरी पुष्कराज इंगवले यांच्या पुष्कराज स्पोर्टस् शूटिंग अॅकॅडमीमध्ये मार्गदर्शन घेतलेल्या जिल्ह्यातील विविध शाळांतील २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील २१ विद्यार्थ्यांची विविध गटांमध्ये पदके प्राप्त केली. या सर्वांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाली.
सोहम जाधव, सिद्धांत सूर्यगंध, करण बेहरे, शुभम पुसाळकर, राधिका सुर्वे, आर्यन बनप, ओम जाधव, तनया शिवलकर, जिया चव्हाण, देवर्षी कासार, दुर्गा जाधव आणि सानवी देसाई यांना सुवर्णपदकं प्राप्त झाली आहेत. दिग्विजय चौगुले, ऋग्वेद बेंडके, पार्थ साळवी, प्रथमेश गद्रे, किमया जाधव, जुनेरा काझी या खेळाडूंना रौप्यपदके प्राप्त झाली. निदिश कदम, अनाम शेमले आणि साद काझी यांना कास्यपदके मिळाली. या खेळाडूंनी ओपन साईट रायफल, पिस्तूल, पीप साईड रायफल अशा विविध प्रकारच्या नेमबाजी या क्रीडाप्रकारात भाग घेऊन ही पदके प्राप्त केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.