आंबडस-काडवली पुलावर खड्डेच खड्डे

आंबडस-काडवली पुलावर खड्डेच खड्डे
Published on

-ratchl३१.jpg-
P२४N१५८५०
चिपळूण ः अरूंद असलेला काडवली मार्गावरील पूल.
---------------

आंबडस-काडवली पुलावर खड्डेच खड्डे

वाहन चालकांची कसरत ; अपघाताचे वाढले धोके
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः खेड तालुक्यातील आंबडस ते काडवली रस्त्याची दूरवस्था झाली आहे तसेच या मार्गावरील पुलावर खड्डेच खड्डे असून या पुलावरून वाहने चालवणे वाहनचालकांना जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण होण्याबरोबरच नव्याने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पंधरागावकडे जाण्यासाठी आंबडस-काडवली हा महत्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरील रस्त्याची दूरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. उन्हाळ्यात खड्डे बुजवून मलमपट्टी करण्यात आली; मात्र खड्डे बुजवण्याचे काम तकलादू ठरले आहे. यामुळे खड्ड्यांमधूनच वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. याचा त्रास होत असून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा रस्त्याचे डांबरीकरणच करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. याच मार्गावर केळणे फाट्याजवळ नदीवर पूल असून या पुलाला बरीच वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे हा पूल अरूंद असल्याने एकाचवेळी दोन वाहने ये-जा करू शकत नाही. आता या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांची कसरत होत असून वाहने रेलिंगवर आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. हा पूल नव्याने बांधण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही कामांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com