कुवारबाव ग्रामपंचयात परिसर झाला स्वच्छ

कुवारबाव ग्रामपंचयात परिसर  झाला स्वच्छ
Published on

कुवारबाव ग्रामपंचायत
परिसर झाला स्वच्छ

रत्नागिरी : कुवारबाव ग्रामपंचायतीच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांसमवेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फिरून रस्त्यावर टाकलेला कचरा जाळून टाकून परिसर स्वच्छ केला. रहिवाशांना स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र पटवून देऊन स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा संदेश घरोघरी पोहोचवण्याची मोहीम राबवली. या अभियानात स्थानिक ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग दिला. पत्रकार कॉलनी येथील रहिवासी प्रभाकर कासेकर, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश शिंदे आदींनीही अभियानात भाग घेतला.
------

रत्नागिरीत शालेय जलतरण
स्पर्धेचे उद्‍घाटन

रत्नागिरी : शालेय जिल्हा जलतरण स्पर्धा नुकतीच जलतरण तलाव येथे झाली. या वेळी प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, क्रीडाधिकारी अक्षय मारकड, क्रीडाधिकारी गणेश जगताप आणि रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपाळ बेंगलोरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरवात झाली. संघटनेचे अध्यक्ष मनोज साळवी उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून मनीषा बेडगे, प्रथमेश बेडगे, विवेक विलणकर, विनायक पवार, उमेश मिलके, बेंगलोरकर, देवेन बेडगे, यश देविदास, सौरभ बलेकर, ओम पेडणेकर यांनी काम पाहिले. देवेंद्र मंजुळे, राकेश आंजर्लेकर, संजय बेडगे, रश्मी मिलके, सागर पाटील, प्रवीण शिवलकर, चिन्मय पोईकार, आर्यन चांदोरकर यांनी तांत्रिक सहाय्यक म्हणून स्पर्धेचे काम पाहिले.
-----
औषध दुकानांना
पेपर बॅगचे वितरण

साडवली : सत्य, अहिंसा, सहिष्णुता जगाला समर्पित करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने संगमेश्वर बाजारपेठ व संगमेश्वर बसस्थानक तसेच रिक्षास्टॅंड येथे एक हजार कापडी पिशव्या व संगमेश्वर येथील सर्व मेडिकल यांना १ हजार पेपर बॅगचे वाटप करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण यांनी प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या वेळी ५० स्वयंसेवक आणि एनएसएस विभागप्रमुख प्रा. अनिल नेमण, प्रा. तेजस्विनी सावंत, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. दीपिका पवार, प्रा. पृथ्वीराज वाडकर, प्रा. संतोष खरे, प्रा. दीपक भोसले, ग्रंथपाल प्रा. गौरी भोसले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com