

-rat३p१०.jpg-
P२४N१५८६४
टेंब्ये स्वामी
-----
‘टेंब्ये महाराज प्रबोधिनी’चे अधिवेशन
पावसमध्ये १९, २० ला आयोजन; मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्रीस्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात १९ व २० ऑक्टोबरला अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
हे विसावे अधिवेशन आहे. यात श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या साहित्यावर सकाळी ९ ते ६ या वेळेत राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षापूर्वी स्वामीजींच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील समाधीस्थानी ऑक्टोबर २००२ रोजी नारायणकाका ढेकणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज प्रबोधिनीची स्थापना झाली. स्वामीजींच्या संपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन, विविध भाषांमध्ये भाषांतर, स्वामीजींच्या संपूर्ण जीवन कार्याचा प्रसार ही प्रबोधिनीची मुख्य उद्दिष्टे आहेत. या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्याशी संपर्क साधावा.
---
मोठी ग्रंथसंपदा
टेंब्ये स्वामी यांनी श्री द्विसहस्त्री गुरू चरित्र, श्री दत्त पुराण, योगरहस्य आणि बोधरहस्यावर द्विसहस्त्री टीका - चुर्णिका, श्री दत्त काव्य त्रिशती, श्री गुरु संहिता (समश्लोकी), सप्तशती गुरु चरित्रसार, श्री कृष्णालहिरींवरील टीका यासारखी फार मोठी ग्रंथ संपदा संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्यासाठी निर्माण करुन ठेवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.